Date With Saie Teaser : सई ताम्हणकरची नवी थरारक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला
डेट विथ सई (Photo credit : facebook)

Date With Saie Official Teaser : मराठीमध्ये आपल्या ग्लॅमरस अदा आणि सहजसुंदर अभिनय यांमुळे एक वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री, सई ताम्हणकर आता मालिका, चित्रपटानंतर वेब सीरिज विश्वात पाऊल टाकत आहे. ‘डेट विथ सई’ अशा या नव्या वेब सीरिजचे नाव असून, ZEE5 वर ती लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (हेही वाचा : Photo : सई ताम्हणकरच्या आयुष्यात आला नवा बॉयफ्रेंड?)

या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करतो, सईच्या नकळत तिचे चित्रीकरण तो आपल्या मोबाइल कॅमे-यात करत असतो. या चित्रपट निर्मितीसाठी हा चाहता तिच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडून आणतो. जेव्हा सईला या चाहत्याबद्दल समजते तेव्हा काय घडते हे या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये सई स्वत:च्याच म्हणजेच सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिकेत दिसेल.

याबाबत सई म्हणते, “डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामुळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचे तुमच्यावरच प्रेम कसे जीवघेणेही ठरू शकते, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे”.