Photo : सई ताम्हणकरच्या आयुष्यात आला नवा बॉयफ्रेंड?
सई ताम्हणकर (Image Credit: Stock Photos)

महाराष्ट्राची बिकिनी गर्ल सई ताम्हणकरने फक्त मराठीच नाही तर तमाम अमराठी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ग्लॅमरस लूक सोबतच आशयघन चित्रपटांमुळे सईने अतिशय कमी वेळात चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच सईच्या एका नजरेने घायाळ होणाऱ्या जनतेला, तिच्या प्रेम जीवनाबद्दल फारच उत्सुकता आणि आकर्षण असते. सईने अमेय गोसावीसोबत जेव्हा लग्नगाठ बांधली तेव्हा कित्येकांचे काळीज तुटले होते. मात्र हे नाते काही फार काळ टिकू शकले नाही. सई आणि अमेयचा हा प्रेमविवाह होता. घटस्फोट झाल्यानंतर ही बातमी या दोघांनी फार काळ माध्यमांपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर परत एकदा सई कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे ही बातमी वाऱ्यासारखी इकडे तिकडे फिरत होती, मात्र त्या व्यक्तीचे नाव समोर येत नव्हते.

नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने सईने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. या व्यक्तीचे नाव आहे घनश्याम लालसा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

घनश्याम लालसा हा देखील अभिनेता आहे. त्याने हायर, हंसा यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केले आहे. सई आणि घनश्याम या दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केल्यानंतर ही बातमी समोर आली.

 

 

View this post on Instagram

 

#रंगपंचमी #happyholi #festival #colorsofindia

A post shared by Ghanshyam Lalsa (@ghanshyamonly) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ghanshyam Lalsa (@ghanshyamonly) on

याबाबत सईने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नसली, तरीही फोटोवरील कमेंट पाहता सई आणि घनश्याम यांमध्ये कोणत्या प्रकारचे नाते बहरत आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.