Sonu Nigam visited Kedarnath Temple: प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगम याने आज सकाळी केदारनाथचे दर्शन घेतले. सोनू निगम आज सकाळी 7.15 वाजता हेलिकॉप्टरने केदारनाथ(Kedarnath) धामला पोहोचला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले. हेलिपॅडवर मंदिर समितीने सोनू निगमचे स्वागत केले. कुटुंबीयांसोबत सोनू निगम केदारनाथच्या दर्शनासाठी दाखल झाला होता.
भाविकांच्या रांगेतून सोनू निगमने शंकराचे दर्शन घेतले. त्यानंतर भगवान शंकराची पूजा केली. जलाभिषेक केला. यावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधला, केदारनाथचा आशीर्वाद मिळाला. सदैव देवाचा ऋणी राहिलो आहे. संघर्षाच्या दिवसांत साथ दिली, अशा भानवा व्यक्त व्यक्त केल्या.
Uttarakhand | Singer Sonu Nigam visited Lord Kedarnath temple this morning. pic.twitter.com/4iFHs2ZYQl
— ANI (@ANI) June 26, 2024
सोनू निगमने जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी, पंजाबी, उडिया, तामिळ, बंगाली, मराठी भाषांत त्याने गाणी गायली आहेत. त्याने गायलेले माता राणीचे जागरण, भजनालाही प्रसिद्धी मिळाली आहे.