Paurashpur Teaser (Photo Credits: YouTube)

एकता कपूर निर्मित 'पौरषपुर' (Paurashpur) या नव्याकोऱ्या वेबसिरीजचा टीझर लॉन्च झाला आहे. यात मिलिंद सोमण (Milind Soman) एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. यात मिलिंद सोमण सह अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde), अनु कपूर (Anu Kapoor) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आल्टबालाजीने मिलिंद, शिल्पा यांचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर मिलिंद सोमणने देखील इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला अनोखा अंदाज चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.

वेबसिरीजमधील गोष्ट राजे आणि राणी यांच्या काळातील असली तरी पुरोगामी आहे. लैगिंक संबंध या कथेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. यात मिलिंद अँड्रोगेनस दाखवण्यात आला आहे. जगाला लिंग भेदभावापासून दूर करण्याचा या वेबसिरीजचा उद्देश असून यात लिंगाची लढाई पाहायला मिळणार आहे.

पहा टीझर:

मिलिंद सोमण याचा लूक:

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

शिल्पा शिंदे लूक:

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

टीझरवर चाहत्यांच्या प्रतिक्रीयांचा वर्षाव होत असून यामुळे प्रेक्षकांची सिरीजबद्दलची उत्सुकताही वाढली आहे. सचिंद्र वत्स यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली असून AltBalaji आणि Zee5 वर 29 डिसेंबरपासून पौरषपुर ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.