वटपौर्णिमेचा सण हा सुवासिनींसाठी महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. यंदा हा सण रविवारी 16 जून 2019 दिवशी साजरा होणार आहे. सामान्यांप्रमाणे यंदा सेलिब्रिटी नववधूंमध्येही या सणाची उत्सुकता असेल. यंदा मराठी मराठी सिनेक्षेत्रात वावरणार्यास्मिता तांबे, सखी गोखले, सुरभी हांडे, नेहा गद्रे यांची यंदा पहिली वटपौर्णिमा आहे. त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन कसं असेल याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घ्या वटपौर्णीमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी
सखी गोखले
सखी गोखले आणि सुव्रत जोशी काही महिन्यांपूर्वी कर्जतच्या सगुणा बाग येथे एका हटके प्रकारच्या विवाहसोहळ्यामध्ये लग्नबंधनात अडकले. सध्या सखी लंडनला असल्याने तिची पहिली वटपौर्णिमा कशी असेल? कुठे असेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
सुरभी हांडे
'म्हाळसा' म्हणून घराघरात पोहचलेली सुरभी हांडे देखील यंदा लग्न बंधनात अडकल्याने तिच्या घरीदेखील पहिल्या वटपौर्णिमेची लगबग सुरू असेल.
नेहा गद्रे
अभिनेत्री नेहा गद्रेनेदेखील पुण्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. त्यामुळे नेहादेखील यंदा पहिल्यांदा वटपौर्णिमेचा सण साजरा करणार आहे.
स्मिता तांबे
अभिनेत्री स्मिता तांबे ही मराठमोळी असली तरीही तिने एका दाक्षिणात्य साथिदारासोबत आपला संसार थाटला आहे. आता ती वटपौर्णिमा साजरी करणार का?
पतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना केली जाते. वडाला दोरा गुंडाळून सात जन्म हाच पती मिळो! म्हणून प्रार्थना केली जाते.