Video : सई ताम्हणकर स्टँँड-अप कॉमेडी क्षेत्रात; ठाण्यात पार पडला पहिला प्रयोग
सई ताम्हणकर (File Image)

Sai tamhankar's stand up comedy show : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशी एकमेव अभिनेत्री असेल जिने अभिनयासोबतच इतर अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, ती म्हणजे सई ताम्हणकर. बिकिनी घालून धुमाकूळ माजवणाऱ्या सईने दुनियादारी, वजनदार, लव्ह सोनिया, राक्षस अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. काही दिवसांपूर्वी सईने कोल्हापूरची कुस्ती टीम विकत घेऊन आखाड्यातही दंगल माजवली, तर आता सई वेबसीरिजच्या विश्वातही पाऊल टाकत आहे. सईच्या ‘डेट विथ सई’चा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. या सर्वांसोबतच सई अजून एका वेगळ्या क्षेत्रात उडी घेत आहे ते म्हणजे, स्टँँड-अप कॉमेडी. (हेही वाचा : Date With Saie Teaser : सई ताम्हणकरची नवी थरारक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला)

सई ताम्हणकर (File Image)

स्टँँड-अप कॉमेडीनंतर अभिनयाकडे वळलेली अनेक उदाहरणे आपणाला दिसतील मात्र, स्टँँड-अप कॉमेडी क्षेत्रात आजपर्यंत कोण्या सुपरस्टारने प्रवेश केला नाही. मात्र आता सईने हे आव्हान लीलया पेलले आहे. सई ताम्हणकरने आपल्या इन्‍स्‍टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड करत, या आपल्या नव्या स्टँँड-अप कॉमेडीच्या प्रयोगाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानुसार NH04, ड्रंकयार्ड, ठाणे येथे रविवारी संध्याकाळी 6 वा. हा सईचा स्टॅंड-अप कॉमेडी शो थाटात पार पडला.

याविषयी सई ताम्हणकर म्हणते, 'एक जॉनर म्हणून कॉमेडीची माझ्या मनात एक वेगळी जागा आहे. या क्षेत्राबद्दल मला खूप आदरही आहे. मी माझ्या करीयरमध्ये काही कॉमेडी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. पण स्टँडअप कॉमेडी खूप वेगळी असते. रंगमंचावर प्रेक्षकांसमोर लाइव अभिनय करण्याची मजा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव घेऊन पाहायचा आहे'.