अखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो
दीपिका-रणवीर विवाहसोहळा (Photo Credit : Twitter)

इटलीमध्ये आज लेक कोमो परिसरातील एका अलिशान व्हिलामध्ये बॉलिवूडची खास जोडी रणवीर आणि दीपिका विवाहबंधनात अडकले. तर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.  मात्र फिल्मफेअरने एक फोटो ट्विटरद्वारे अखेर शेअर केला आहे.

दीपिका आणि रणवीर या दोघांनी अगदी जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पाडला. तर आज या दोघांचे लग्न कोंकणी पद्धतीने झाले असून उद्या बेंगलोरी पद्धतीने पुन्हा त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. तर फिल्मफेअरने त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणवीरचा फर्स्ट लुक पाहायला मिळाला आहे. तसेच चाहत्यांना त्या दोघांच्या लग्नाचे अजून फोटो पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

या दोघांचे रिसेप्शन मात्र 28 नोव्हेंबरला मुंबईतल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. तसेच बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी या रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. मात्र लग्नाच्या रिसेप्शनसाठी गिफ्ट न आणता त्यांनी चॅरिटीसाठी डोनेशन करावे असे आवाहन केले आहे.