Rajat Poddar Passes Away: PC X

Rajat Poddar Passes Away: प्रसिध्द प्रोडक्शन डिझायनर आणि कला दिग्दर्शक रजत पोद्दार यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रजत यांच्या निधनानंतर, चित्रपटसृष्टीत शोक पसरला आहे. अनेक कलाकारांसह चाहत्यांनी देखील त्यांना श्रध्दांजली वाहली आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. (हेही वाचा- कट्टर शिवसैनिक आणि माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास)

मीडियारिपोर्टनुसार, रजत लंडन येथे असताना त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अनीज बज्मी यांनी सोशल मीडियावर रजत यांचा फोटो पोस्ट करून निधनाचे वृत्त दिले. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anees Bazmee (@aneesbazmee)

रजत पोद्दारने 'लाइफ इन ए... मेट्रो', 'काइट्स', 'गुंडे', 'बर्फी', 'भूल भुलैया 2 आणि 3', 'पठाण' आणि 'फाइटर' यासह अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले .त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बॉलिवूडमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण झाली होती. याशिवाय ते आगामी अनेक बिग बजेट आगामी चित्रपटांमध्येही काम करत होता. पोद्दार यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.