Rahat Fateh Ali Khan Apologises: राहत फतेह अली खान यांनी मारहाण केलेला तरूण त्यांचा शिष्य; व्हिडिओ वायरल झाल्यानंतर जारी केला 'हा' खुलासा (Watch Video)
Rahat | Twitter

प्रसिद्ध पाकिस्तानी पार्श्वगायक आणि कव्वाली गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक व्हिडिओ काल सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. वायरल व्हिडिओ मध्ये राहत फतेह अली खान एका तरूणाला मारहाण करताना दिसत आहेत. सोशल मीडीयामध्ये राहतच्या वागण्यावर नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. 'बाटली' न ठेवण्याच्या रागामध्ये त्यांनी  तरूणाला चप्पलेने मारल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाकिस्तानी मीडीया Dawn च्या वृत्तानुसार नंतर राहत कडून माफीचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी हा गुरू-शिष्यामधील खाजगी प्रकार असल्याचं ते म्हणाले आहेत. यामध्ये मारहाण झालेल्या मुलाचं नाव Naveed Hasnain आहे. नावेद सोबत राहत ने एक व्हिडीओ जारी केला आहे त्यामध्ये या वादाची सुरूवात एका बॉटलने झाली असून त्यामध्ये पीर कडून पवित्र करून आणलेलं पाणी होतं. ही बॉटल नावेद कडून गहाळ झाली होती आणि तो त्याबद्दल विसरला होता असं तो सांगताना दिसत होता. Rahat Fateh Ali Khan Viral Video: राहत फतेह अली खानने नोकराला केली बेदम मारहाण? पाकिस्तानी गायकाचा व्हिडिओ व्हायरल! 

'ते माझे वडील आणि माझे शिक्षक आहेत. आपल्यावर खूप प्रेम करतात. ज्याने हा व्हिडिओ लीक केला आहे त्याचा यामागे ब्लॅकमेल करून गुरूची बदनामी करण्याचा उद्देश होता.' असे तो पुढे म्हणाला. राहतने पुढच्या क्षणी Naveed Hasnain कडून माफी मागितल्याचेही डॉनने वृत्त दिले आहे.

राहत फतेह अली खान ला 2019 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली. 50 हून अधिक अल्बम ज्याला ऑनलाइन एक अब्जाहून अधिक व्ह्यूज, आहेत. टेलिव्हिजन मालिकांचे 50 हून अधिक टायटल ट्रॅक आणि हॉलीवूड, बॉलीवूड दोन्हीमध्ये 100 हून अधिक चित्रपटातील त्यांनी गाणी गायली आहे.