Parineeti Chopra-Raghav Chadha सलग दोनदा एकत्र स्पॉट झाल्याने रंगल्या डेटिंगच्या चर्चा; जाणून घ्या त्यांच्यामधील 'हे' कनेक्शन!
Parineeti Chopra-Raghav Chadha । ट्वीटर

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोपडा (Parineeti Chopra) आणि आप खासदार राघव चढ्ढा (AAP MP Raghav Chadha) एकदा नाही तर सलग दोनदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मुंबई मध्ये 23 मार्चच्या रात्री एका बड्या रेस्टॉरंट मध्ये ते डिनरला आणि आज 24 मार्च दिवशी दुपारी पुन्हा लंच साठी ते एकत्र दिसले. त्यांच्या या सलग दोनदा एकत्र जेवायला जाण्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. काल दोघांनी पांढर्‍या कपड्यांचं ट्विनिंग देखील केलं होतं.

दरम्यान परिणिती आणि राघव यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगत असल्या तरीही इंडिया टुडेच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट्सनुसार ते दोघं एकमेकांना डेट करत नाहीत.

परिणीती आणि राघव यांच्यामधील कनेक्शन

परिणीती आणि राघव यांच्या गाठीभेटीमुळे नेटिझन त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगवत असले तरीही ते दोघं चांगले मित्र असल्याचा आणि एकमेकांना डेट करत नसल्याचा दावा इंडिया टुडेने केला आहे. परिणीती बॉलिवूड अभिनेत्री आणि राघव चढ्ढा आपचे खासदार असले तरीही ते लंडनमध्ये एकाच संस्थेमध्ये शिकले आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्या दोघांचे शिक्षण झाले आहे. यामुळे त्यांचा मित्रपरिवार सारखाच आहे.

राघव चढ्ढा हे ट्वीटर वर केवळ 44 जणांना फॉलो करतात. त्यामध्ये दोनच बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यापैकी एक Gul Panag आहेत. त्या आपच्या सदस्य आहेत तर दुसरी अभिनेत्री परिणीती आहे.

आज दुपारी मुंबईत एका रेस्टॉरंट मधून बाहेर पडल्यानंतर राघव आणि परिणितीला कॅमेर्‍यात टिपण्यात आलं. दोघेही एकाच कारमध्ये बसून निघाले. त्यावेळी आधी राघव गाडीत बसले नंतर परिणितीने छायाचित्रकारांना काही फोटो दिले आणि राघव यांच्यासोबत गाडीत बसून ते दोघेही निघून गेले.

परिणिती हीचं नाव यापूर्वी director Maneesh Sharma सोबतही जोडण्यात आले होते. Uunchai या सिनेमात परिणिती शेवटची दिसली आहे. तर राघव चढ्ढा हे संसदेतील सर्वात तरूण खासदार आहेत. राघव यांच्या रूबाबदार अंदाजामुळे तरूणांमध्ये त्यांची खास क्रेझ आहे.