Navratri Day 3 White Colour: शारदीय नवरात्रीमध्ये (Sharadiya Navratri) आज तिसरा दिवस आहे. 17 ऑक्टोबर दिवशी यंदा घटस्थापना करून नवरात्रीची सुरूवात झाली आहे. दरम्यान भारतभर यंदा कोरोनाच्या सावटाखाली सण साजरे होत असल्याने रास, दांडिया, गरबा नसला तरीही सर्वत्र नवरात्रीचे नऊ रंग पाळले जात आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंग सारेजण परिधान करतात. त्यानुसार आज नवरात्रीच्या तिसर्या माळेदिवशी पांढरा रंग (White Colour) आहे. तर उद्या 20 ऑक्टोबर दिवशी लाल रंग आहे. आज पांढर्या रंगाची भूरळ मराठी कलाकारांनाही पडली आहे. अनेकांनी सोशल मीडीयामध्ये पांढर्या शुभ्र वस्त्रांमधील त्यांचे लूक्स शेअर केले आहे. पांढरा रंग हा सर्वसाधारणपणे शांततेचा रंग आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये पांढरा रंग हा कधीच आऊट ऑफ फॅशन जाऊ शकत नाही अशा समजल्या जाणार्या रंगांपैकी एक आहे. मग यंदा नवरात्रीच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी केलेली पहा पांढर्या रंगातील ग्लॅमरस वेषभुषा! Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!
नवरात्री 2020च्या पांढर्या रंगातील लूक
प्राजक्ता माळी
दरम्यान नवरात्रीत नऊ रंगांप्रमाणे दर दिवशी वेषभूषा करण्यामागे कोणतीही धार्मिक मान्यता नाही. मात्र केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून समोर आलेली संकल्पना आहे. पण तरूणाईसोबतच ऑफिस मधूनही नोकरदार मंडळींनी ही संकल्पना उचलून धरली आहे. दरम्यान यंदा कपड्यांसोबतच नवरात्रीच्या रंगांप्रमाणे मास्क देखील वापरले जात आहेत. यामध्येही व्हरायटी पहायला मिळत आहे.