Natasa Stankovic And Himanshu Pandya (Photo Credit: Instagram)

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रृणाल पांड्या (Krunal pandya) यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर केसाळला आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यापाठोपाठ आता हार्दिकची पत्नी नताशा (Natasa Stankovic) हिने देखील भावूक झाल्याचे दिसत आहे. नुकताच नताशाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर मुलगा अगस्त्य आणि सासरे हिमांशु पांड्या यांचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सासऱ्यांच्या आठवणीत नताशाने लिहले आहे की, "तुम्ही आम्हाला सोडून गेलात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही आपल्या कुटुंबातील सर्वात कणखर आणि मजेशीर सदस्य होतात. तुमच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत. तुमच्या जाण्याने सर्वानांच मोठा धक्का बसला आहे. मला आनंद आहे की, तुम्ही तुमचे जीवन नेहमी स्वताच्या अंदाजात जगलात. मी अगस्त्यला त्याच्या आजोबांच्या या गोष्टी नक्की सांगेल", अशा आशयाची पोस्ट नताशाने इंस्टग्रामवर केली आहे. हे देखील वाचा- Brisbane Weather for January 19: ब्रिस्बेन टेस्ट सामन्याला पाचव्या दिवशीही बसणार पावसाचा फटका? असा आहे हवामानाचा अंदाज

नताशाची इंस्टग्राम पोस्ट-

यापूर्वी हार्दिकने वडिलांसोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली होती. "तुम्हाला आम्ही गमावले आहे. ही गोष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुले जे काही मिळवू शकली आहेत. ते फक्त तुमच्यामुळे.' 'तुम्हाला गर्व होता. पण आम्हाला सर्वांना गर्व आहे की, तुम्ही तुमचे जीवन आनंदात घालवले. तुमची नेहमी आठवण येईल", अशा प्रकारे हार्दिकने वडिलांचे निधन झाल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.