Mumbai Traffic Police

Mumbai Traffic Police: मुंबईच्या फूटपाथवर दुचाकी पार्क करून प्रवाशांचा रस्ता अडवत असल्याचा व्हिडिओ एका महिला परदेशी पर्यटकाने 'ट्विटर एक्स' या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. त्याची दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारावर कारवाई केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर १२२/१७७ एमव्हीए अंतर्गत कारवाई केली. हिल रोडवरील व्होडाफोन दुकानाजवळ या महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी महिला पर्यटक दुचाकीस्वाराला समजावून सांगत असल्याचेही दिसून येत आहे. यावेळी महिलेने त्याला आपली दुचाकी फूटपाथवरून खाली उतरवण्यास सांगितले.

पाहा व्हिडीओ: 

दरम्यान, महिलेने तिच्या 'ट्विटर एक्स'वर लिहिले आहे, 'लोकांना सांगण्याचा आणखी एक दिवस की फूटपाथ ड्रायव्हिंग/पार्किंगसाठी नसून पादचाऱ्यांसाठी आहे. महिलेने पुढे लिहिले की, 'मला सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या कायद्याचा अनादर करण्यात इतका अभिमान बाळगतात आणि ते नेहमी म्हणतात.‘वेलकम टू इंडिया’ अशी पोस्ट तुम्हाला जगाला दाखवायची आहे का?