
Mohammed Rafi Birthday Special : बॉलिवूड संगीतामध्ये आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध करणर्या गायकांपैकी एक नाव म्हणजे मोहम्मद रफी (Mohammed Rafi) . 1950 ते 1980 च्या काळात हिंदीप्रमाणेच अनेक भारतीय भाषांमध्ये मोहम्मद रफी यांनी गाणी गायली आहेत. रफी साहेबांची जशी हिंदी गाणी आजही रसिकांच्या मानात गुंजी घालतात त्याप्रमाणेच मराठी गाण्यांमधील त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. प्रामुख्याने श्रीकांत ठाकरेंनी (Shrikant Thackeray) संगीतबद्ध केलेली गाणी रफी साहेबांनी मराठीत गायली आहे.
मग पहा मोहम्मद रफींनी गायलेली अजरामर मराठी गाणी -
शोधिशी मानवा
हा रूसवा सोड सखे
हा छंद जीवाला
अगं पोरी संबाल दर्याला
अरे दु:खी जीवा बेकरार, खेळ तुझा न्यारा, नको आरती की, नको भव्य वाडा, प्रकाशातले तारे तुम्ही, प्रभू तू दयाळू, माझ्या विराण हृद्यी, विरले गीत कसे, हे मना आज कोणी ... मोहम्मद रफी यांनी एकूण 12 मराठी गाणी गायली आहेत. मात्र ही सारी गाणी नॉन फिल्मी गाणी होती. कोणत्याच चित्रपटासाठी मोहम्मद रफी यंनी मराठी गाणं नाही. आज रफींची 95 वी जयंती आहे.