मेक्सिकोची Andrea Maza बनली Miss Universe 2020, COVID19 बद्दल 'हे' उत्तर देत पटकावला पुरस्कार
Miss Universe 2020 (Photo Twitter)

Andrea Meza Crowned Miss Universe 2020: मिस युनिव्हर्स 2020 च्या विजेत्याची घोषणा आज करण्यात आली आहे. हा पुरस्कार मेक्सिकोची अॅंड्रिया मेजा हिने जिंकला आहे. फ्लोरिडा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ग्रँड इव्हेंटमध्ये माजी मिस युनिव्हर्स जोजिबिनी टुंजी हिने हा अँड्रिया हिला मिस युनिव्हर्सचे ताज घातले. या इव्हेंटमध्ये ब्राझीलची जुलिया गामा पहिली रनरम राहिली. तर पेरुची जैनिक मसीटा दुसरी रनरप ठरली. त्याचसोबत भारताची एडलीन कॅस्टेलिनो आणि डोमनिक रिपब्लिकची किंम्बर्ली पेरेज तिसरी आणि चौथी रनरप राहिली.

देशासाठी गर्वाची गोष्ट अशी की, एडलीन कॅस्टेलिनो हिने आपल्या कॉन्फिडेंट अंदाजात टॉप 5 मध्ये आपले स्थान मिळवले. दरम्यान, येथे मेक्सिकोची अँड्रिया मेज हिला कोविड19 संदर्भातील एक महत्वाचा प्रश्न विचारला होता. यावरचे तिचे उत्तर ऐकून सर्वांची मनं जिंकली. तिला देशाची प्रमुख असती तर कोविड19 सोबत कसा लढा दिला असता? हा प्रश्न विचारण्यात आला होता.(Friends: The Reunion: तब्बल 17 वर्षानंतर ते 6 मित्र पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; 27 मेला HBO Max वर प्रदर्शित होणार 'फ्रेंड्स: द रीयूनियन')

Tweet:

यावर अॅंन्ड्रिया हिने उत्तर देत असे म्हटले की, मला असे वाटते कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी कोणताही योग्य उपाय नाही आहे. परंतु कोविड19 संबंधित काही महत्वाचे निर्णय घेऊन त्यात लॉकडाउनचा सुद्धा समावेश केला असता. या परिस्थिती आपण खुप जणांना गमावले असून ही स्थिती हाताळू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांची काळजी घेतली पाहिजे.

त्यानंतर अँड्रिया हिला तिच्या सौंदर्याबद्दल प्रश्न विचारला. यावर तिने म्हटले की, माझी सुंदरता अशी एक गोष्ट आहे जी फक्त आत्मा नव्हे तर मनातून सुद्धा येते. आपण वेगाने प्रगति करणाऱ्या समाजात आहोत आणि त्याससोबत स्टिरियोटाइप करण्याची आपली मानसिकता वाढली आहे. यासाठी आपल्याला व्यवहार आणि वागण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. एखाद्याला हा हक्क दिला नाही पाहिजे की, तो आपल्याला अमूल्यवान समजेल.