Zee Chitra Gaurav 2020 Winners: झी चित्र गौरव 2020 पुरस्कार जाहीर; ललित प्रभाकर आणि सायली संजीव ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी
Zee Chitra Gaurav 2020 Winners (Photo Credits: Instagram)

मराठी सिने तारकांसोबत रसिकांना ज्या चित्रपट सोहळ्यासाठी उत्सुकता लागलेली असते तो 'झी चित्र गौरव 2020 पुरस्कार' (Zee Chitra Gaurav 2020 Winners) नुकताच जाहीर झाला. यात समीर विध्वंस दिग्दर्शित आनंदी गोपाळ (Anandi Gopal) या चित्रपटाने बाजी मारली असून या चित्रपटातील गोपाळरावांची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर आटपाडी नाईट्स (Atpadi Nights) या चित्रपटातील नायिका सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला आहे.

झी चित्र गौरव 2020 पुरस्कार सोहळ्यात आनंदी गोपाळ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागासह सर्वोत्कृष्ट रंगभूषा, छायाचित्रण, संगीत दिग्दर्शन, पार्श्वगायिका, गीतकार या विभागात पुरस्कार पटकाविले आहेत. या चित्रपटातील अभिनेता ललित प्रभाकर याने इन्स्टाग्राम पोस्ट करत माझा पहिला झी गौरव पुरस्कार असून या चित्रपटाचा आणि दिग्दर्शकाचा मला अभिमान आहे असे म्हटले आहे.

हेदेखील वाचा- Anthem Tu ahes na: राहुल देशपांडे ते आदर्श शिंदे, रोहित राऊत यांनी विविध अंदाजात स्त्री चा महिमा सांगितलेलं 'अँथम तू आहेस ना!' (Video)

तर आटपाडी नाईट्स या चित्रपटाची अभिनेत्री सायली संजीव हिने देखील इन्स्टावर पोस्ट करत लोकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या प्रेमबद्दल आभार मानले आहेत.

झी चित्र गौरव 2020 पुरस्कार सोहळा लवकरच टिव्हीवर प्रसारित करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनाच या सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे.