Yearender 2018: वर्षाअखेरीस सर्वाधिक ट्रोल झालेल्या यादीत 'या' मराठी कलाकाराचे नाव झळकले
Marathi Actor (Photo Credits- Twitter)

Yearender 2018: सध्या इंटरनेटवर कोणत्याही साध्या गोष्टीवरुन सामान्य माणसापासून ते दिग्गज कलाकारांनी ही नेटकऱ्यांनी त्यांनी केलेल्या गोष्टींवर ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे 'या' मराठी कलाकाराचे नाव 2018 मध्ये सर्वाधिक ट्रोल झाले आहे.

मराठी कलाकारांमध्ये 'महागुरु' म्हणून ओळख असणारे सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांना 2018 या वर्षात सर्वाधिक ट्रोल करण्यात आले आहे. ट्रोल करण्यामागील कारण असे आहे की, पिळगावकरांनी स्वत:च दोन मराठीमध्ये गाणी गायली. एक आमची मुंबई आणि दुसरे दिमाग मे भूसा ही गाणी यु ट्युबवर खूप व्हायरल झाली. परंतु गाण्यातील नृत्य दिग्दर्शन, गाण्याचे बोल आणि चित्रिकरण यामुळे नेटकऱ्यांनी पिळगावकरांना चांगलच पिळवटून टाकले. काही नेटकऱ्यांनी त्यांनी गायलेल्या गाण्याखाली आपल्या प्रतिक्रिया देत हास्याचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांनी केलेल्या प्रतिक्रियांबद्दल फेसबुकवरुन पिळगावकरांनी स्पष्टीकरण दिले होते. तरीही त्यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेपेक्षा गाण्यांवरुन जास्त ट्रोल केले आहे.