Triple Seat Trailer: वायरलेस प्रेमाची आगळी वेगळी गोष्ट घेऊन आलाय 'ट्रिपल सीट' चित्रपटाचा ट्रेलर
Triple Seat Trailer (Photo Credits: YouTube)

सत्य घटनेवर आधारित एका वायरलेस प्रेमाची गोष्ट घेऊन आलेला 'ट्रिपल सीट' (Triple Seat) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि पल्लवी पाटील (Pallavi Patil) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्रमुख भूमिकेतील या तीन व्यक्तिरेखा पाहून हा लव्ह ट्रायअँगल असणार असं ट्रेलरवरुन दिसतय. संकेत पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीट या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतिकुमार फिरोडिया आणि स्वप्निल संजय मुनोत यांनी केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

चित्रपटाच्या ट्रेलरवरुन एका मिसकॉल वरुन सुरु झालेली अंकुश आणि शिवानीची प्रेमकथा आहे असे दिसतय. त्यात ट्विस्ट म्हणून आयुष्याच्या जोडीदार निवडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा अंकुश पल्लवी ची निवड करतो आणि मग अंकुश, शिवानी आणि पल्लवी प्रेमाचं त्रिकुटात पुढे काय काय घडतं हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

ट्रिपल सीट चित्रपटाचा ट्रेलर:

हेदेखील वाचा- Happy Birthday Shivani Surve: बिग बॉस 2 नंतर शिवानी दिसणार अंकुश चौधरी सोबत 'ट्रिपल सीट' सिनेमात; पहा नवं पोस्टर

या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रवीण तरडे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगल्ये आणि योगेश शिरसाठ अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

चित्रपटाच्या नावावरुन जरी हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'डबल सीट' चित्रपटाचा सिक्वेल वाटत असला तरी ट्रिपल सीट च्या ट्रेलर वरुन या दोन्ही चित्रपटांच्या कथांचा दोन विरुद्ध टोकाच्या असल्यामुळे त्यांचा काही संबंध नाही असंच दिसतय.