घराच्या शोधात निघालेल्या गृहिणीचा खडतर प्रवास दाखवणारा 'Welcome Home'चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Welcome Home (Photo Credits: YouTube)

घरासाठी तसेच संपुर्ण कुटूंबासाठी राबणा-या स्त्री चं नेमकं घर कोणतं, ह्या प्रश्नाचा मागोवा घेणारा 'Welcome Home'हा सिनेमा येत्या 14 जून ला आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात गोड, सालस, निरागस भूमिकेत दिसणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे (sumitra bhave) आणि सुनील कथनकर(sunil kathanakar) यांनी केले असून सुमित्रा भावे यांनी या चित्रपटाचे लेखनही केले आहे.

पाहा 'Welcome Home'चा ट्रेलर:

घर म्हणजे नेमकं काय? आणि स्त्रीचं खरं घर कोणतं, ह्या प्रश्नाचा शोध घेणारा हा चित्रपट आहे असे या ट्रेलरवरुन दिसतयं. स्त्री च्या अस्तित्वाचा शोध घेणारा हा चित्रपट असेल असेच एकूण या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन दिसतय. हा ट्रेलर राधे राधे गाण्याच्या सूरात प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच ह्या सिनेमातील इतर गाणीही खूप श्रवणीय आहेत.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Welcome Home Movie Poster: ‘वेलकम होम’ सिनेमात मृणाल कुलकर्णी साकारणार महत्त्वाची भूमिका

ट्रेलरमध्ये दिसणारी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट पाहून या चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.