Welcome Home Movie Poster: ‘वेलकम होम’ सिनेमात मृणाल कुलकर्णी साकारणार महत्त्वाची भूमिका

येत्या १४ जूनला प्रदर्शित होणा-या ‘वेलकम होम’ ह्या मराठी सिनेमात मृणाल कुलकर्णी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Welcome Home Movie Poster: ‘वेलकम होम’ सिनेमात मृणाल कुलकर्णी साकारणार महत्त्वाची भूमिका
welcome home movie poster. photo credits-facebook

हिंदी तसेच मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये आपली छाप सोडलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी लवकरच एका नवीन भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे. येत्या १४ जूनला प्रदर्शित होणा-या ‘वेलकम होम’ (Welcome Home) ह्या मराठी सिनेमात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे (sumitra bhave) आणि सुनील कथनकर(sunil kathanakar) यांनी केले असून सुमित्रा भावे यांनी या चित्रपटाचे लेखनही केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. नुकतंच ह्या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

चित्रपटाची कथा घर, कुटुंब या संकल्पनेवर आधारलेली आहे. त्यातही स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं आणि त्या घरात तिचं अस्तित्व काय ह्या प्रश्नाचा शोध ह्या चित्रपटात घेण्यात आला आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय सुंदर आणि लक्षवेधी आहे. ह्या पोस्टरमध्ये मृणाल कुलकर्णीचे व्यक्तिमत्त्व खूपच उठून दिसत आहे. 'अश्रुंची झाली फुले' नाटक पुन्हा रंगमंचावर; सुबोध भावे साकारणार 'लाल्या'ची भूमिका? (Video)

या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी तगडी स्टारकास्ट आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2019 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).