Tejaswini Pandit 'त्या' हॉट फोटोमुळे झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर
Tejaswini Pandit (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या तिच्या एका फोटोमुळे बरीच चर्चेत आली आहे. तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तिच्या अनेकांनी ट्रोल केले असून त्यावर ब-याच कमेंट्स केल्या आहेत. तर तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज प्रचंड आवडला आहे. ज्या ट्रोलरने तिला या फोटोवरुन कमेंट केले आहे तिला तेजस्विनीने सडेतोड शब्दांत उत्तर दिले आहे. 'मी एक अभिनेत्री आहे' असे सांगत त्याच्या टिकेला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

तेजस्विनीने निळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये आपल्या बेडवर एक हॉट पोज देत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तेजस्विनीन खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने 'A Chameleon Soul' असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Marathi Filmfare Awards 2020: मुंबईत रंगला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा, कोणत्या चित्रपटांनी मारली बाजी येथे पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर एकाने 'जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे…' असे म्हटले आहे. हे कमेंट पाहून तेजस्विनीने त्याला याचे सडेतोड उत्तर दिले आहे. 'बाकी वेळेस हे असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे… दोन्ही दिसू शकते नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील अशी पण' असे तेजस्विनीने कमेंटमध्ये म्हटले आहे.

तेजस्विनीने न केवळ हॉट ड्रेसमधील तर साडीतील फोटोज देखील सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असतात. तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर 971k फॉलोअर्स आहेत. तसेच तेजस्विनीच्या या हॉट फोटोला 54 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.