अभिनेत्री तेजस्विनी पंडित मांसाहारी जेवण 'असे' खाणे करते पसंत; ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
Tejaswini Pandit (Photo Credits: Instagram)

या जगात प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या त-हा, वेगवेगळ्या पद्धती असतात असे म्हणायला हरकत नाही. अनेकांना खाताना तोंडाचा आवाज काढण्याची सवय असते. मराठीत आपण त्याला 'मटामटा' खाणे असे म्हणतात. विशेष करुन मांसाहारी (Non-Veg) खाणा-या खवय्ये ताटात असलेल्या चिकन, मटणाच्या रश्श्यावर, हाडांवर ताव मारताना आजूबाजूचे भान विसरुन सुर्रर्रर्रर्र करुन पिण्यात मग्न होतात. ही सवय केवळ सामान्यांना असते असे म्हणणा-या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने फाटा दिला आहे. अलीकडेच झी मराठीवर झालेल्या एका चॅट शो मध्ये तेजस्विनी मांसाहारी जेवण खाण्यामागचे रहस्य कळाले.

झी मराठीच्या एका चॅट शो मध्ये तेजस्विनीच्या मित्रांनी तिची मांसाहारी जेवण म्हणजे चिकन खाण्याची सवय सांगितली जी ऐकून तुम्हाला हसू आवणार नाही. त्यांनी सांगितले की, तेजस्विनी घरात किंवा हॉटेलमध्ये गेली आणि चिकन खात असेल तर त्याच्या नळ्या ही ती ताटात ठोकून ठोकून त्यातील मांस खाते. तिच्या अशा पद्धतीने खाण्यावर तिच्या मित्रांनी अनेकदा आक्षेप घेतला.

मात्र यावर स्वत:ची बाजू मांडत तेजस्विनी म्हणाली की, चिकन हा असा पदार्थ विशेषत: त्याची हाडे तसेच नळ्या हे ठोकून खाण्यातच खरी मजा आहे. तसेच तेव्हा भात आणि रस्सा हा चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे मी पसंत करते, असेही ती पुढे म्हणाली.

हेदेखील वाचा- नवरात्री Special फोटोशूटच्या तयारीसाठी Tejaswini Pandit ला लागले तब्बल 27 तास

तिच्या या उत्तरावर तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांचा या गोष्टीवर विश्वासही बसला नसता, जर तेजस्विनीने याबाबत स्पष्टीकरण दिले नसते. पण यावरुन थोडक्यात असे दिसते की, तेजस्विनी ला अस्सल मराठमोळी मुलगी आहे जी नाळ महाराष्ट्राच्या मातीची जुळली आहे. जिला मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद त्याच पद्धतीने घेणे आवडतो.

नवरात्रीत तेजस्विनी पंडित हिने साकारलेले नवदुर्गांचे रुप आणि त्यातून दिलेला सामाजिक संदेश तिच्या चाहत्यांना खूप भावला होता. या रुपांतून तेजस्विनीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.