Vartman Poster Out: सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला 'वर्तमान' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
Vartman Poster (Photo Credit: Instagram)

कट्यार काळजात घुसली, लोकमान्य एक युगपुरुष, बालगंधर्व, डॉ.काशिनाथ घाणेकर यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट देणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) लवकर एका वेगळ्या अवतारात आपल्या भेटीला येणार आहे. त्याचा आगामी चित्रपट 'वर्तमान' (Vartman) चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यात तो एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये सुबोधच्या पाठीमागे वर्तमान पत्रातील बातम्या दिसत असून बाजूला पेन दिसत आहे. या पोस्टर वरून लक्षात येते की पत्रकार व पत्रकारिता यावर थेट भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हेमंत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पाटील म्हणाले की सध्याच्या परिस्थिती मध्ये आमदार खासदार आणि नेतेमंडळी यांचा जनतेशी व सर्वसामान्य नागरिकांशी वागण्याचा व पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो.हेदेखील वाचा- 'जीव झाला वेडापिसा' मालिकेतील हेमंत जोशी यांचे कोविड19 मुळे निधन

या चित्रपटात सुबोध भावे मंगेश ,देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते अशा अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण नंदकुमार पाटील, संकलन संतोष जीवनजीकर, कला दत्ता लोंढे, नृत्य फुलवा खामकर, वेशभूषा सपना बन्सल तर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत दुधगावकर, गीतकार, इलाही जमादार, संगीत हर्षित अभिराज तर चित्रपट लेखन संजय पवार यांनी केले आहे.

चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील म्हणाले की मराठीतील मल्टीस्टारर व दर्जात्मक कथानक असलेला चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेईल.

दरम्यान अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे (Subodh Bhave) याने मानापमान या नव्या संगीतमय चित्रपटाची घोषणा केली आहे. संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाचं सिनेमामध्ये रूपांतरण केल्यानंतर आता तो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर (Krushnaji Khadilkar) यांच्या नाटकावर आधारित 'मानपमान' (Manapman) या नव्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. काल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्याने सोशल मीडियात याची घोषणा करत पहिला टीझर शेअर केला आहे. यामध्ये कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात असली तरीही संगीत शंकर- एहसान-लॉय सांभाळणार आहेत तर निर्माते सुनिल फडतरे आहेत.