शो मॅन सुभाष घई (Subhash Ghai) यांचा नाव कोरा मराठी सिनेमा विजेता (Vijeta) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आज सुबोध भावे याने या सिनेमाचे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे. यामध्ये सुबोध भावे (Subodh Bhave) , नेहा महाजन, पूजा सावंत, पूजा बिष्ट, माधव देवचक्के, सुशांत शेलार व देवेंद्र चौघुले अशी मल्टिस्टार कास्ट पाहायाला मिळणार आहे. जो अनेक पराभवनानंतरही टिकून राहतो तोच खरा विजेता असं म्हणत सुबोधने हे पोस्टर शेअर केले आहे. ‘विजेता’ येत्या 12 मार्चला प्रदर्शित होणार आहे. Vijeta Movie Poster: खेळाची पार्श्वभूमी असलेल्या 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, सुबोध भावे दिसणार महत्त्वपुर्ण भूमिकेत
जसे की आपण या पोस्टरमध्ये पाहू शकता की, पूजा सावंत यात सायकलिंग करताना तर नेहा महाजन धावताना दिसत आहे. तसेच विविध प्रकारचे खेळ या पोस्टवर पाहू शकतो. सुबोध भावे, नेहा महाजन व पूजा सावंत ते त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
सुबोध भावे पोस्ट
अनेक पराभवानंतरही जो टिकून राहतो तोच खरा 'विजेता'#विजेता #Vijeta #12March2020@SubhashGhai1 @meghnaghaipuri @parifarooqui @sooreshpai @subodhbhave @IAmPoojaSawant @madhavdeochake @PritamKagne @ashishgharde01 @MuktaA2Cinemas @MuktaArtsLtd pic.twitter.com/5AJxe6yKSN
— सुबोध भावे (@subodhbhave) February 2, 2020
सुभाष घईं नी याआधी 'सनई चौघडे', 'वळू' आणि 'समिता' या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. विजेता हा सिनेमा देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे ते सांगतायत. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे हे लक्षात येतय.सुबोध या चित्रपटातून कोणती भन्नाट व्यक्तिरेखा साकारणार हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.