मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या सुंदर नृत्याविष्कार आणि अदांमुळे चाहत्यांची आवडती नायिका बनली आहे. तिच्या दिलखेचक अदांनी तिने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नेहमीच आपल्या कामात व्यस्त असणारी सोनाली सध्या मॉरिशसमध्ये (Mauritius) सुट्टी एन्जॉय करतेय. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या डान्सचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. मॉरिशस हे मुख्य करून तेथील निळ्याशार समुद्रांमुळे आणि तेथील पारंपारिक गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. तेथील समुद्र किनारे जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच तेथील सेगा नृत्यही (Sega Dance). मग या नृत्याची भुरळ सोनालीला पडल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडिओमध्ये सोनाली मॉरिशसच्या समुद्रकिना-यावर तेथील पारंपारिक वेषात असलेल्या महिलांसोबत सेगा नृत्य करताना दिसत आहे.
तिने आपल्या या व्हिडिओखाली मॉरिशसला कोणी गेले आणि तिथे सेगा नृत्य केले नाही असे होणारच नाही. त्यामुळे मी ही या सेगा स्टेप्स शिकत आहे असे म्हटले आहे. मॉरिशसमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
सोनाली लवकरच 'झिम्मा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मीती क्षिती जोग आणि स्वाती खोपकर करणार असून दिग्दर्शनाची धूरा हेमंत ढोमेंनी सांभाळली आहे.