अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार्‍या नव-यासोबत दुबई मध्ये थापतेय भाक-या; फॅन्स सोबत शेअर केला खास व्हिडिओ, Watch Video
Sonalee Kulkarni and Kunal benodekar (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीची हिरकणी फेम सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) लॉकडाऊनमुळे सध्या दुबईमध्ये आपल्या होणा-या नव-यासोबत म्हणजेच कुणाल बेनोडेकर सोबत छान एन्जॉय करतेय. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आपले व्हिडिओज, फोटोजच्या माध्यमातून आपल्या बद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना देत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती दुबईमध्ये कुणाल बेनोडेकर  (Kunal Benodekar) सह छान भाक-या थापताना दिसत आहे. 'हिरकणी' च्या शूटिंगदरम्यान भाक-या थापल्याची ट्रेनिंगचा आज उपयोग झाला असे तिने या व्हिडिओखाली म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये सोनाली भाक-या थापतेय तर कुणार भाकरी भाजताना दिसत आहे. या व्हिडिओखाली सोनालीने हिरकणीच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला.

हेदेखील वाचा- Sonalee Kulkarni Engagement: सोनाली कुलकर्णी हिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर नेमका आहे कोण? जाणून घ्या त्याच्याविषयी 'या' खास गोष्टी

 

View this post on Instagram

 

आधी हाताला चटके तवा इंडक्शन वर भाकर .... रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले... “हिरकणी" साठीच्या training चा एक भाग म्हणून..... आता दुबईतल्या एका tower मधे तोच अनुभव कामी येतोय... कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!! #throwback🔙 #video #Hirkani #mondaymotivation #alwaysastudent #keeplearning #keepgrowing #teamwork

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

सोनाली म्हणतेय "रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले “हिरकणी" साठीच्या training चा एक भाग म्हणून. आता दुबईतल्या एका tower मधे तोच अनुभव कामी येतोय." कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!! असही तिने म्हटले आहे.

लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि कुणाल ने कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये (Dubai) साखरपुडा करून घेतला. सध्या तिचे कुटूंब देखील दुबईत वास्तव्यास आहेत.