Shimmgga Title Teaser:  राजेश शृंगारपुरे , भूषण प्रधान घेऊन येणार 'शिमगा', 15 मार्चला होणार रीलीज
Shimmgga (Photo Credits: You Tube)

Shimmgga Title Teaser:  मराठीमधील बिग बॉसचा पहिला सीझन गाजवलेला राजेश शृंगारपुरे लवकरच 'शिगमा' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर 'शिमगा' हा कोकणवासीयांसाठी खास सण असतो. पण 'शिमगा' (Shimmgga) या सिनेमामध्ये सण आणि त्याच्यामधील राजकारण अशा काही घटनांभोवती फिरणार असल्याचं त्याच्या पहिल्या झलकमधून दिसून येत आहे.

पहा 'शिमगा' सिनेमाचा टीझर

शिमगा सिनेमाच्या पहिल्या टीझरमध्ये कोणत्याच कलाकाराची झलक दाखवली नाही. मात्र काही सूचक डायलॉग्स आहेत. या सिनेमामध्ये राजेश शृंगारपुरे (Rajesh Shringarpure), भूषण प्रधान ( Bhushan Pradhan) प्रमुख भूमिकेत असतील. हा सिनेमा 15 मार्च दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन निलेश क्रिश्न यांचं आहे.