Sharmishta Raut Haladi Kunku (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने 11 ऑक्टोबर 2020 रोजी तेजस देसाई (Tejas Desai) याच्यासोबत लग्न केले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत का होईना पण साग्रसंगीत असा हा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर अलीकडचे तिचे हनिमूनचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. शर्मिष्ठा आपल्या पती तेजसह मालदीव्सला गेली होती. त्यानंतर लग्नानंतरचे पहिले हळदीकुंकू (H नुकतेच करण्यात आले. सासरी आपल्या पतीसह हलव्याचे दागिने घालून छान नटलेली शर्मिष्ठा सध्या सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्मिष्ठाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या पहिल्या हळदीकुंकूवाचे फोटोज शेअर केले आहेत.

या फोटोजमध्ये शर्मिष्ठाने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलव्याचे सुंदर आणि रेखीव असे दागिने घातले आहेत. यात कोल्हापूरी साज, झुमके, बिंदी, नथ, बांगड्या, बाजूबंद, कंबरपट्टा, अंगठी, मंगळसूत्र असा आभूषणांचा समावेश आहे.हेदेखील वाचा- Sharmishta Raut Wedding: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत-तेजस देसाई यांची अशी जुळून आली रेशीमगाठ; घरातील 'या' व्यक्तीने घडवली दोघांची भेट!

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

त्याचबरोबर शर्मिष्ठाचा पती तेजस देसाई याने देखील गुलाबी रंगाचा कुर्ता घातला असून त्यावर गळ्यात हलव्याची माळ घातली आहे.

शर्मिष्ठाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने मन उधाण वा-याचे, जुळून येती रेशीमगाठी, कुंपण, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श या चित्रपटांतही काम केले आहे. बिग बॉस मराठी सिजन 1 मध्ये शर्मिष्ठा राऊतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. यात शर्मिष्ठा, सई, आऊ, मेघा धाडे यांची मैत्री खूपच चर्चेत होती. शर्मिष्ठा वाइल्ड कार्ड एन्ट्री असून सुद्धा टॉप 5 पर्यंत पोहोचली होती.