Shankar Patil On Matric Poster: कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांवर आला चित्रपट,'शंकर पाटील ऑन मॅट्रिक' चा मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक आला समोर
Shankar Patil On Matric Poster (Photo Credits: Instagram)

कोरोना काळात अनेकांवर उपासमारीचे संकट आले, अनेक बेघर झाले, तर अनेकांच्या नोक-या गेल्या. दरम्यान दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आणि त्यांना सरासरी गुणांच्या आधारावर पास करण्यात आले. हाच विषय उजेडात आणून एक नवा मराठी चित्रपट (Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. 'शंकर पाटील ऑन मॅट्रिक' (Shankar Patil on Matric) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे पोस्टर रिलिज केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावासोबत एक वाक्यही दिसत आहे. होय मी करोना लाभार्थी असं हे वाक्य आहे. तसंच या पोस्टरमध्ये एका व्यक्तीच्या हातात बोर्डाच्या परीक्षेचं मार्कशीट दिसत आहे.हेदेखील वाचा- Radhe: Your Most Wanted Bhai Trailer: बहुप्रतिक्षित 'राधे' सिनेमाचा ट्रेलर आऊट; अॅक्शन थ्रिलर सिनेमात पहा Salman Khan चा दमदार अंदाज (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

विजू यांनी हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. त्यांनी यासोबत एक कॅप्शनही दिलं आहे. ते म्हणतात, “असं शिकून काय भरणार पोट? तर म्हणे हाताची घडी नि तोंडावर बोट..लवकरच थिएटरात निकाल लागणार..”

या सिनेमातील स्टारकास्टबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे यात कोणते आघाडीचे कलाकार असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच या चित्रपटातील गाणीही अद्याप समोर आलेली नाही. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हे पोस्टर शेअर करत विजू यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता 10वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई सोबत आता महाराष्ट्र बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.