ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची हृद्यस्पर्शी कहाणी ‘बाबा’ या मराठी चित्रपटामधून रसिकांसमोर आली होती. संजय दत्त (Sanjay Dutta) निर्मित हा मराठी सिनेमा आता साता समुद्रापार जाण्याच्या तयारीमध्ये आहे. 'बाबा'(Baba) या मराठमोळ्या सिनेमाची निवड आणि प्रदर्शन अमेरिकेतील ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाले आहे. अशी माहिती सिने निर्मात्यांनी दिली आहे. 5 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या ’गोल्डन ग्लोब्ज’च्या नामांकनांच्या यादीत 'बाबा' सिनेमा प्रवेश करेल असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय दत्त निर्मित पहिला मराठी सिनेमा 'बाबा' मध्ये दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, बालकलाकार आर्यन मेंघजी प्रमुख भूमिकेत झळकले होते. “चित्रपटाची निर्मिती हा माझ्यासाठी भावनात्मक विषय आहे. ‘बाबा’ हा माझा पहिला चित्रपट असल्याने जागतिक स्तरावर झालेल्या या प्रदर्शनाचा मला खूप आनंद आहे. यापुढे आणखी यश लाभावे अशी माझी प्रार्थना आहे आणि त्याची प्रतीक्षा मला असणार आहे,” असे मत दिग्दर्शक राज गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. ('बाबा' सिनेमातील मध्यवर्ती भूमिकेत दिसणारा बालकलाकार आर्यन मेंघजी बद्दल खास गोष्टी)
'बाबा' हा मला खूपच प्रिय असलेला एक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा पहिल्यांदा मला ऐकवली गेली, तेव्हापासून तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे. अशाप्रकारच्या चित्रपटामध्ये काम करणे हे कोणत्याही कलाकारासाठी एक मोठी गोष्ट असते आणि या चित्रपटातील माधवची भूमिका करण्याची संधी मला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे.” असे मत दीपक
दोब्रीयाल यांनी व्यक्त केले आहे.