Aryan Mengaji

संजय दत्त (Sanjay Dutt) 'बाबा' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीमध्ये निर्मात्याच्या माध्यमातून प्रवेश करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता रसिकांच्या मनात या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 'भावनेला भाषा नसते' या टॅगलाईन आधारित या सिनेमात 'आर्यन मेंघजी' (Aryan Menghaji) प्रमुख भूमिकेत झळकत आहे. निरागस चेहर्‍यामुळे सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या नजरेत भरलेला हा चिमुकला नेमका आहे कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बाबा सिनेमात काम करण्यापूर्वी आर्यन 15 ऑगस्ट या सिनेमात झळकला होता. हा सिनेमा ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या 9 वर्षाच्या आर्यनने गणपती बाप्पा मोरया, कुलस्वामिनी या मराठी आणि अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सध्या गाजत असलेल्या मराठी ऐतिहासिक मराठी मालिकेमध्ये त्याने छोट्या राजाराम राजेंची भूमिका केली आहे. ‘१५ ऑगस्ट’ चित्रपटातील त्याची भुमिका विशेष गाजली.

मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष प्रदर्शित होणारा ‘बाबा’ हा आर्यनचा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमाकडून त्याला आशा आहेत. Baba - Official Trailer: मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)

‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. 2 ऑगस्टला 'बाबा' सिनेमा रिलीज होणार आहे.