नुकत्याच प्रदर्शित झालेला 'बाबा' (Baba) सिनेमाने चक्क उंच भरारी घेतली आहे. 'गोल्ड ग्लोब 2020' साठी विदेशी भाषा विभागात या सिनेमाची निवड झाली आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने या सिनेमाद्वारे पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.
'भावनेला भाषा नसते,' अशी या सिनेमाची टॅगलाईन असून यात मूक बधिर जोडपे आणि त्यांच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. शहरातून आलेले दुसरे जोडपे जेव्हा त्यांच्या मुलावर आपला हक्क सांगू लागते तेव्हा त्याचा होणारा संघर्ष सिनेमात पाहायला मिळत आहे. मुक्या शब्दांनी आपल्या व्याकुळ भावना व्यक्त करत वडील-मुलामधील नाते उलगडणाऱ्या 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचा भेटीला (Watch Video)
दीपक दोब्रीयाल यांच्यासह नंदिता पाटकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर या कलाकारांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ('बाबा' सिनेमातील मध्यवर्ती भूमिकेत दिसणारा बालकलाकार आर्यन मेंघजी बद्दल खास गोष्टी)
‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’यांनी एकत्रितपणे सिनेमाची निर्मितीसुत्रं हाताळली असून राज आर गुप्ता यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर रोहन रोहन यांनी सिनेमातील गाण्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
समीक्षकांकडून कौतुक होत असलेल्या 'बाबा' सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाची भावूक, हळवी कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
'गोल्डन ग्लोब'मध्ये सिनेमाची निवड झाल्यानंतर निर्मात्या मान्यता दत्त यांनी सांगितले की, "आम्ही आनंदी असून एक अर्थपूर्ण आणि मनोरंजन करणारा सिनेमा निर्मित करण्याचा आमचा मानस होता. आणि बाबा हा सिनेमा तसाच आहे. या सिनेमावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतील, अशी मला आशा आहे."