'डोंबिवली रिटर्न' सिनेमा घेऊन संदीप कुलकर्णी अभिनेता आणि निर्मात्याच्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार
Dombivli Return Movie Poster (Photo Credits : Facebook)

Dombivli Return Movie Poster : डोंबिवली फास्ट (Dombivli Fast) सिनेमातून माधव आपटे या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आलेला संदीप कुलकर्णी (Sandeep kulkerni) आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. सायकोथ्रीलर बाजातील हा सिनेमा आता सिक्वेलच्या स्वरूपात पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'डोंबिवली  रिटर्न'  (Dombivli Return) असे या सिनेमाचं नाव असून संदीप कुलकर्णी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता आणि निर्माता संदीप कुलकर्णी

'डोंबिवली रिटर्न' या सिनेमातून केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर तो एक निर्माता म्हणून देखील सिनेमाची बाजू सांभाळणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 'डोंबिवली रिटर्न' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याचं एक खास पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची निर्मिती होणार आहे. संदीप कुलकर्णी सोबत या सिनेमामध्ये अभिनेत्री राजश्री सचदेव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. महेंद्र तेरेदेसाई (Mahendra Teredesai) या सिनेमाचं दिगदर्शन करणार आहे.

संदीप कुलकर्णी यापूर्वी श्वास, डोंबिवली फास्ट, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला होता. त्यापूर्वी 'अवंतिका' या मालिकेतील संदीपची भूमिका विशेष लक्षात राहणारी आहे.