Sai Lokur Devkarya Vidhi (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री सई लोकुर (Sai Lokur) हिला लग्नाचे वेध लागले असून येत्या 30 नोव्हेंबरला तिचे तीर्थदिप रॉय (Tirthdeep Roy) सोबत लग्न होणार आहे. त्यामुळे लग्नाआधी तिचे अनेक विधी आणि कार्यक्रम होत आहे. काल म्हणजेच 27 नोव्हेंबरला तिचे देवकार्य विधी (Devkarya Vidhi) झाला असून या समारंभाचे सुंदर फोटोज तिने शेअर केले आहे. खणाच्या साडीतील सईचा मराठमोळा लूक चाहते फार पसंत करत आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक केले असून लग्नासाठी तिला खूप सा-या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सईच्या मेहंदीचा कार्यक्रम (Mehendi Programme) होणार आहे.

सईने आपल्या कुटूंबियांसोबत देवकार्य विधीचे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने खणाची साडी नेसली असून मोत्यांची सुंदर असे दागिने परिधान केले आहेत. केसात गजरा, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा छान लूक सईचा दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई लोकुर हिने शेअर केलेल्या लग्नपत्रिकेच्या व्हिडिओनुसार, आज संध्याकाळी 6.30 वाजता तिचा मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे.हेदेखील वाचा- Sai Lokur Wedding Card: ठरलं! सई लोकुर आणि तीर्थदिप रॉय यांच्या लग्नपत्रिका आली समोर, #SAIDEEPROY म्हणत शेअर केला हा सुंदर Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

29 नोव्हेंबरला हळदी आणि सीमंत पूजा व हळदी, 30 नोव्हेंबरला लग्न आणि रिसेप्शन असे सर्व साग्रसंगीत विधी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

या सर्व विधींमध्ये सोशल डिस्टंसिंगची योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या सर्व विधींमध्ये सईने विशेष रंगाचे ड्रेसकोड देखील ठेवले आहेत.