
सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिचे सध्या फिल्मी करियर जोरदार सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिच्यासोबत 'Hundred' या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती. या वेब सीरिजचे प्रेक्षकांना प्रचंड कौतुक केले. विशेष करुन रिंकूचा यातील अभिनय देखील प्रेक्षकांना भावला. त्यानंतर काही काळ गायब असलेली रिंकू आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी लागली आहे. यासाठी ती सध्या लंडनमध्ये शूटिंग करत आहे. 'छूमंतर' (Chumantar) असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच तिने या चित्रपटातील तिचा नवा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.
छूमंतर च्या सेटवरील स्वत:चा एक फोटो रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमधील तिचा लूक खूपच वेगळा आणि हटके दिसत आहे. Hundred Trailer: 'रिंकू राजगुरु'चा हिंदी वेबसिरिज 'हंड्रेड'द्वारे डिजिटल डेब्यू; लारा दत्तासोबत गुप्तहेर बनून उडवली धमाल (Video)
पाहा फोटोज:
या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी प्रमुक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहे. छूमंतर चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने रिंकू पहिल्यांदाच लंडनमध्ये शूटिंग करत आहे.
रिंकूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती अमिताभ बच्चन सोबत झुंड या चित्रपटात देखील दिसणार आहे. थोडक्यात रिंकूची करियरची गाडी ही सुसाट असल्याचे यावरून दिसत आहे. तिच्या या दोन्ही चित्रपटांची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.