Ranjana Deshmukh Best Marathi Songs: निखळ हास्य, बोलका चेहरा, गालांवर सुंदर तीळ अशी अभिनयाची सम्राज्ञी म्हणून ज्या अभिनेत्रीचा उल्लेख होतो त्या ज्येष्ठ अभिनेत्री रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांची आज पुण्यतिथी. 3 मार्च 2000 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवास हा तेजाकडून तिमिराकडे नेणारा होता. 1975 साली व्ही. शांताराम यांच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटातून त्यांनी मराटी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटातून मोठ्या संख्येने आपला चाहतावर्ग निर्माण करणा-या रंजना देशमुखांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. चानी, सासू वरचढ जावई, सुशीला, गुपचूप, गोंधळात गोंधळ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर सादर केले.
इतकच नव्हे तर 'अरे संसार संसार' आणि 'गुपचूप गुपचूप' चित्रपटांसाठी त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. असे करता करता यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या होत्या जिथे इतक्या कमी वेळात पोहोचणे या सिनेसृष्टीतील भल्याभल्यांना जमले नाही. अशा या गोड, निरागस आणि खोडकर अभिनेत्रीची 80 च्या दशकात गाजलेली 5 सदाबहार गाणी:
अगं अगं म्हशी:
पाहिले न मी तुला:
हा सागरी किनारा:
ही कशाने धुंदी आली:
तो एक राजपुत्र:
लक्ष्मीच्या जिच्या पायाशी लोळत होती त्या अभिनेत्रीला मात्र नशिबाने साथ दिली नाही. 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँगलोरला जाताना मोटार अपघातात रंजना कायमची अपंग झाली. या अपंगत्वाने रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला. मात्र तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी 'फक्त एकदाच' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र तेथेही नशिबाने त्यांना साथ दिली नाही.
अखेर 3 मार्च 2000 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंजना देशमुख यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली अभिनेत्री पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त लेटेस्टली मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.