छत्रपती शिवराय आणि भगवा झेंडा यांचे नातं सांगणारे फत्तेशिकस्त चित्रपटातील 'रणी फडकती' गाणे प्रदर्शित, अंगावर काटा आणणारे हे गाणे एकदा पाहाच
Rani Phadakti Song (Photo Credits: YouTube)

छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसतं नाव जरी काढलं तरीही अंगात सळसळत रक्त तयार होते. छत्रपती शिवराय आणि भगवा झेंडा म्हणजे मर्द मराठ्यांची शान. या झेंड्याचे आणि शिवरायांचे असलेले घट्ट नाते सांगणारे फत्तेशिकस्त चित्रपटातील 'रणी फडकती' (Rani Phadakti Lakho Zende) हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांची प्रमुख भूमिका असलेले हे गाणे ऐकल्यावर अंगावर काटा आणल्याखेरीज राहणार नाही. फर्जंद सिनेमानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) हा सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. छत्रपतींच्या पराक्रमी शौर्याची गाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

मूठभर मावळ्यांच्या साथीने मुघलांना धडा शिकवणार्‍या शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीमध्ये 'गनिमी कावा' हा त्यांना फायदेशीर ठरला. याच रोमांचकारी गनिमी काव्यावर आधारित शिवरायांचे सर्जिकल स्ट्राईक 'फत्तेशिकस्त' या सिनेमातून रसिकांसमोर उलगडणार आहे.

पाहूयात या चित्रपटातील 'रणी फडकती' हे गाणे

या गाण्याचे गीतकार विष्णू सखाराम खांदेकर असून देवदत्त बाजी हे या गाण्याचे गीतकार आहेत. गायक अजय पुरकर आणि आशुतोष मुंगळे यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- 'फत्तेशिकस्त' सिनेमाचं पहिलं पोस्टर; उलगडणार शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची कहाणी

'फत्तेशिकस्त ' सिनेमामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर,अनुप सोनी अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.