
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'रंपाट'(Rampaat) सिनेमाची पहिली झलक आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रसिकांसमोर आली आहे. रवी जाधव पुन्हा रुपेरी पडद्यावर लहान मुलांचे भावविश्व साकारणार आहेत. आज पहिला टिझर रसिकांसमोर आला असला तरीही सिनेमातील कोणत्याच कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मात्र तुम्हांला नक्कीच थिरकायला लावेल असे एक मराठी रॅप (Marathi Rap Song) आहे. यामधून मुलांचा त्यांच्या स्वप्नांशी होत असलेला पाठलाग दाखवण्यात आला आहे.
अभिनय,नृत्य पासून ते अगदी कुस्तीच्या फाडापर्यंतची या चिमुकल्यांची स्वप्न आहेत. त्याची झलक टीझरमध्ये पाहता येते.रवी दिगदर्शित हा सिनेमा मेघना जाधव आणि झी स्टुडिओ यांची निर्मिती आहे. येत्या 26 एप्रिल 2019 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.