Dhappa Trailer: राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्या 'धप्पा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित!
Dhappa Marathi Movie (Photo Credit: Youtube)

Dhappa Marathi Movie Trailer: मराठी सिनेमाला पुन्हा सुवर्ण काळ आला आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे मराठीत आता अधिक आशयघन सिनेमांची निर्मिती होत आहे. त्याचबरोबर मराठी सिनेमात आता नवनवे विषय हाताळले जात आहेत. असाच एक लहान मुलांचे भावविश्व उलघडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) दिग्दर्शित 'धप्पा' (Dhappa) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

लहानपणात असलेली निरागसता, बेधडकपणा कालांतराने कुठेतरी हरवतो. त्यामुळे रोजच्या समस्यांवरही प्रश्न न विचारता आपण 'जावू दे' असं म्हणत दुर्लक्ष करतो. पण लहान मुलांमध्ये ते धैर्य असते. चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याचे धाडस असते. लहान मुलांच्या धाडसाची, जिद्दीची  कहाणी सांगणारा हा सिनेमा आहे.

पाहा ट्रेलर...

गिरीश कुलकर्णी यांच्या लेखणीतून या सिनेमाची कथा अवतरली आहे. तर सुमितलाल शाह यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून गिरीश कुलकर्णी आणि विनायक कुलकर्णी हे सहनिर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 1 फेब्रुवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.