काही दिवसांपुर्वी 'नवरदेव: B.sc Agri' आणि 'फायटर' (Fighter) हे दोन सिनेमे रिलीज झाले. 'फायटर' हा हिंदीतला बिग बजेट सिनेमा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'फायटर'ची उत्सुकता शिगेला होती. तर शेतकऱ्यांच्या आयुष्यावरील संवेदनशील विषयावर आधारित 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाचीही खुप चर्चा होती. हिंदीच्या या बिग बजेट चित्रपटाचा फटका मराठी चित्रपटाला मुंबईत बसताना दिसत आहे. फायटर या चित्रपटामुळे मुंबईत नवरदेव B.sc Agri या सिनेमाला जास्त थिएटर मिळाले नाही आहेत. (हेही वाचा - Fighter Movie Advance booking: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ची अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई)
दरम्यान मुंबईत थिएटर नसल्याने 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमा पाहायला मुंबईतील प्रेक्षक पुण्यात येत असल्याची गोष्ट घडलीय. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाच्या टीमने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमाची टीम थिएटरमध्ये उपस्थित होती. एका प्रेक्षकाने 'नवरदेव'चे शो कमी का आहेत? असा प्रश्न विचारला. हा प्रेक्षक मुंबईहून पुण्याला 'नवरदेव: B.sc Agri' सिनेमा पाहायला आलेला.
पाहा व्हिडिओ -
View this post on Instagram
हिंदीतल्या बिग बजेट 'फायटर'मुळे 'नवरदेव: B.sc Agri' या मराठी सिनेमाला स्क्रीन कमी मिळत आहेत असा खुलासा टीमकडून करण्यात आला आहे. अभिनेता क्षितीश दाते या सिनेमात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशी मोठी कलाकारांची फौज आहे.