नात्यांनी समृद्ध असलेला 'मोगरा फुलला' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Mogra Phulaalaa Poster (File Photo)

'नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा' अशा कॅप्शनमधून नात्यांची एक नवी व्याख्या सांगणा-या 'मोगरा फुलला' (Mogra Phulaalaa) ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ह्या चित्रपटामधून प्रथमच स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि सई देवधर (Sai Deodhar) ही जोडी प्रथमच आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 14 जूनला संपुर्ण महाराष्ट्राच प्रदर्शित होईल. ह्या चित्रपटातून सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी प्रथमच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा स्कूटर वरचा त्याचा लूक सध्या खूप चर्चेत आहे.

ही कथा आहे अशा एक मध्यम वर्गीय घरातील मुलाची जो अनेक कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेला असतो. त्या समस्यांमध्ये तो एवढा गुंतत जातो की, त्यात त्याचे वय कधीन निघून जाते हे त्याला कळतच नाही. अशा वेळी वयाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात येते. तिच्या येण्याने त्याच्या आयुष्यात काय काय बदल होतात आणि की त्याचे आयुष्य आहे तसेच राहते, ते आपल्याला येत्या 14 जूनला कळेलच.

या चित्रपटाची गाणी देखील तितकीच सुंदर आणि श्रवणीय आहेत. त्यातली 'मनमोहिनी', 'मोगरा फुलला' ही गाणी प्रदर्शित झाली आहेत. लिटील चॅम्प आणि गायक रोहित राऊत (Rohit Raut) याने या सिनेमातील 'मोगरा फुलला' शीर्षकगीताचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी हे गाणं गायलं आहे. तर अभिषेक कणकरने हे गाणं लिहलं आहे.

Mogra Phulaalaa Title Track: रोहित राऊत ने संगीत दिग्दर्शित केलेलं 'मोगरा फुलला' गाणं शंकर महादेवन यांच्या आवाजात रीलिज (Watch Video)

'मोगरा फुलला' या सिनेमाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांचं असून ‘जीसिम्स’यांची निर्मिती आहे. या चित्रपटात साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख कलाकार खास भूमिकेत दिसणार आहेत.