सई ताम्हणकर ! (Image Credit: Stock Photos)

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ताच्या वादानंतर आता #MeeToo ही मोहिम भारतामध्ये पोहचली आहे. #MeeToo मोहिमेअंतर्गत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सेट्सवर त्यांच्यासोबत होणार्‍या गैरवर्तवणुकीबाबत उघड बोलायला सुरूवात केली आहे. तनुश्रीने नाना पाटेकरांवर लावलेल्या आरोपांनंतर अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर पाठोपाठ सिनेसृष्टीत 'संस्कारी बाबुजी' अशी ओळख असलेल्या आलोक नाथांवरही बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत.

'तारा' मालिकेच्या निर्मातीने   आलोक नाथांवर लावलेल्या आरोपानंतर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

 

'हम साथ साथ है','हम आपके है कौन' अशा अनेक ब्लॉकबस्टर सिनेमात आदर्श,मायाळू पित्याची भूमिका साकारणार्‍या आलोक नाथांचा नाव पुढे आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्मातीने   आलोक नाथांवर बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावला आहे.

1990साली 'तारा' मालिका टेलिव्हिजनवर  आली होती.   यावेळेस 'संस्कारी बाबूजी' ओळख असलेल्या अभिनेत्याने माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या बाबत लिहताना थेट आलोक नाथांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सई ताम्हणकरने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

आलोक नाथ यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत आता इतक्या वर्षांनी बोलणं निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.