
Ashi Hi Jamva Jamvi Teaser: ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका असलेला 'अशी ही जमवा जमवी' (Ashi Hi Jamva Jamvi) हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. अशी ही जमवा जमवी चित्रपट 10 एप्रिल 202 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीझची वाट पाहत आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, वंदना गुप्ते यांच्यासह सुनील बर्वे तसेच सुलेखा तलवळकर, चैत्राली गुप्ते, तनिष्का विशे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अशी ही जमवा जमवी टीझर रिलीज, पहा व्हिडिओ -
View this post on Instagram