बंध नायलॉनचे नंतर श्रुती मराठे आणि सुबोध भावे ही जोडी पुन्हा रसिकांसमोर येणार आहे. आगामी चित्रपट 'शुभलग्न सावधान' या सिनेमातून श्रुती मराठे आणि सुबोध यांचा रोमान्स पहायला मिळणार आहे. हा सिनेमावर 'लग्न' संस्थेवर भाष्य करणारा आहे.
सुबोध आणि श्रुती प्रमुख भूमिकेत
'शुभलग्न सावधान' या सिनेमात सुबोध भावे 'लग्ना'पासून पळणार्या नायिकाची भूमिका साकारत आहे. तर श्रुती मराठे त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था सिनेमात पहायला मिळणार आहे. सुबोध भावे, श्रुती मराठे यासोबतच चित्रपटामध्ये डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
'शुभलग्न सावधान' सिनेमाची निर्मिती पल्लवी विनय जोशींची आहे तर समीर रमेश सुर्वेने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरपूर्वी गाणं रीलिज
शुभलग्न सावधान सिनेमाच्या ट्रेलरपूर्वी या चित्रपटातील एक गाणंही रीलिज करण्यात आलं आहे. जसराज जोशी आणि किर्ती किल्लेदार यांनी हे गाणं गायलं आहे. तर चिनार महेश यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.