Urmila Kothare Makeover (Photo Credits: Instagram)

आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांची बायको आणि महेश कोठारें (Mahesh Kothare) ची सून सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) गेल्या अनेक दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होती. तिच्या मुली जिजाने त्यांचे अख्ख विश्व व्यापून टाकलं. त्यामुळे तिने आपला वेळ हा पूर्णपणे जिजासोबत घालवला. मात्र गरोदरपणात आणि जिजाच्या जन्मानंतरही फिटेनसच्या बाबतीत आग्रही असलेली उर्मिला आपले अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होती. मात्र सध्या तिचा नवा लुक सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. आई झाल्यानंतर तिने स्वत:चा मेकओव्हर केला असून त्याचे फोटोशूट तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

यात तिचा लूक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या हॉट लूकची चाहत्यांमध्ये सध्या बरीच चर्चो होत आहे.

पाहा फोटो:

हेदेखील वाचा- आदिनाथ कोठारे करत आहेत निर्मितीत पदार्पण; 'इच्छाधारी नागीण' असलेली मालिका आता मराठीतही

तिचे हे ग्लॅमरस फोटो पाहून तिला हॉलिवूडची हॉटनेसच्या बाबती अव्वल असलेली अभिनेत्री जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) शी तुलना केली आहे. तिचे कलर केलेले केस खूपच आणि तिची मादक अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करत आहेत.

उर्मिला कानेटकर च्या 'मला आई व्हायचयं' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दुनियादारी, टाईमपास, ती सध्या काय करते या चित्रपटातूनही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.