Maharashtra Shahir: शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर नातू केदार शिंदे साकारणार चित्रपट; आज जन्मदिनी शेअर केली खास झलक
Maharashtra Shahir | PC: Instagram/ Kedhar Shindhe

'जय जय महाराष्ट्र माझा', 'जेजुरीच्या खंडेराया', 'या गो दांड्यावरून' अशा एकाएकापेक्षा लोकप्रिय गाण्यांचा ठेवा दिलेल्या शाहीर साबळे (Shahir Sable) यांचा आज (3 सप्टेंबर) जन्मदिन आहे. शाहीर साबळेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधत त्यांचे नातू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी शाहीर साबळेंच्या आयुष्यावरील जीवनपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडीयात त्यांनी एक झलक शेअर करत त्याची घोषणा केली आहे. 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) असं या सिनेमाचं नाव असेल. केदार शिंदे स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत तर पटकथा प्रतिमा कुलकर्णी यांची आहे.

शाहीर साबळे यांनी 1942 ची चले जाव चळवळ, भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. 'संयुक्त महाराष्ट्र चळवळीची तोफ' अशी शाहिरांची ओळख होती. समाजात घडणार्‍या चुकीच्या गोष्टींवर आपल्या प्रहसनांमधून अचूक बोट त्यांच्याकडून ठेवलं जात असे. त्यांनी महाराष्ट्र पिंजून 'लोकगीतं' गोळा केली. 'तमाशा' या अस्सल लोककला प्रकाराला त्यांनी आधुनिक नाटकाशी जोडलं आणि रसिकांसमोर मांडलं. 'मुक्तनाट्य' हा नवा प्रकार देखील त्यांनीच सुरू केला. सरकार कडून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 'पद्मश्री', 'महाराष्ट्र गौरव' देण्यात आला आहे. (नक्की वाचा: Baipan Bhaari Deva First Poster: केदार शिंदे यांनी जाहीर केला 'बाईपण भारी देवा' आगामी सिनेमा; 28 मे ला होणार रिलीज).

महाराष्ट्र शाहीर झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedhar Shindde (@kedaarshinde)

दरम्यान 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात त्यांची भूमिका कोण सकारणार आहे हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण 2023 या शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षात हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल असं सांगण्यात आले आहे.