15 August Trailer (Photo Credits: You Tube)

15 August Trailer: माधुरी दीक्षित निर्मित  पहिला सिनेमा '15 ऑगस्ट' नेटफ्लिक्स वर झळकणार 29 मार्च पासून प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra)  'फायरब्रॅन्ड' (Firebrand) या सिनेमानंतर आता माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तिचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) निर्मित पहिला मराठी सिनेमा नेट्फ्लिक्सवर (Netflix) रीलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. '15 ऑगस्ट' (15 August)  असं या सिनेमाचं नाव असून याचा ट्रेलर सोशल मिडीयावर रीलिज करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी एका दिवसात काय काय घडू शकतं याचा उलघडा या सिनेमात करण्यात आला आहे. 29 मार्च 2019 दिवशी '15 ऑगस्ट' हा सिनेमा रीलिज होणार आहे.

15 ऑगस्ट सिनेमाचा ट्रेलर

15 ऑगस्ट या सिनेमामध्ये स्वप्ननील जयकर, राहुल पेठे, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे,वैभव मांगले आदी कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाची कथा एका मध्यमवर्गीय चाळीत राहाणार्‍या कुटुंबांभोवती फिरते. चाळकरी एका हटके अंदाजात स्वातंत्र्यदिन कसा साजरा करतात? याची कथा या सिनेमामध्ये आहे. तसेच या दिवसभराच्या घडामोडीमध्ये एक लव्हस्टोरीदेखील उलगडत जाते. त्यामुळे रसिकांमध्ये या सिनेमामध्ये उत्सुकता निर्माण होईल हे नक्की.

माधुरी दीक्षितने ' बकेट लिस्ट' हा पहिला मराठी सिनेमा केला. त्यापूर्वी माधुरी अनेक बॉलिवूड सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आली होती. मात्र 15 ऑगस्ट हा माधुरीने पती श्रीराम यांच्या सोबत निर्माती या भूमिकेतील पहिला सिनेमा आहे.