Kshitij Zarapkar Passed Away: मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक क्षितीज झरपकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. क्षितीज झरपकर यांच रविवारी सकाळी प्राणज्योत मालवली. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहे. क्षितीज यांच्या निधनाची माहिती मिळताच, त्यांच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा- आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही...", हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीबद्दल श्रेयस तळपदेकडून अनेक शंका उपस्थित)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून क्षितीज झरपकर यांना कर्करोचा आजार होता.त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्करोगाची झुंज अखेर अपयशी ठरली आणि रविवाच्या सकाळी रुग्णालयात असताना, मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यामुळे क्षितीय यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
Kshitij Zarapkar Passed Away : अभिनेता, लेखक, दिग्दर्शक क्षितीज झरापकर यांचे दुखःद निधन
.#kshitijZarapkar #PaaedAway #Death #Actor #Writer #LetsUppMarathi #LetsUppNews #BollywoodNews pic.twitter.com/II1eU5nIxF
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 5, 2024
रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्षितीज यांच्या निधनाची माहिती मिळताच, मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे. क्षितीज झारपकर हे दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते होते. क्षितीज यांनी आजवर अनेक मराठी सिनेमात काम केले. त्यांनी एकुलता एक, आयडीयाची कल्पना, ठेंगा या सारख्या चित्रपटात काम करून आपली छाप निर्माण केली.