मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग लवकरच एका थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला यणार आहे. 'अदृश्य' (Adrishya) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातून पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि मंजरी फडणीस (Manjari Fadnnis) ही जोडी प्रथमच एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सेटवर या दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या शूटिंगदरम्यान चे फोटो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. शिवाय ही केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांच्या उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे.
अदृश्य' हा मराठी बदला घेणारा थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री मंजरी फडणीस मुख्य भूमिकेत असून ती डबल भूमिका साकारत आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक प्रमुख चेहरा असलेला अभिनेता पुष्कर जोग चित्रपटात मंजरीच्या पतीच्या भूमिकेत आहे.हेदेखील वाचा-
बॉलिवूड आणि टॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल निर्मित लवली वर्ल्ड प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'अदृश्य' चित्रपट बनविला जाणार आहे.
अदृश्य' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील सुंदर ठिकाणी केले जात आहे. या चित्रपटात मंजरी फडणीस, सौरभ गोखले आणि पुष्कर जोग तसेच अभिनेत्री उषा नटकर्णी, अभिनेता अजय कुमार सिंह, आनंद जोग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जून मध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. 'अदृश्य' हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रुपात दिसणार आहे. हे सुपरहिट हॉरर आणि थ्रिलर स्पॅनिश चित्रपटाचे रुपांतर आहे. आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.