Aastad Kale (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Aastad Kale: उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट गायक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) चा आज वाढदिवस... 16 मे 1983 मध्ये मध्ये पुण्यामध्ये त्याचा जन्म झाला आहे. आस्ताद आपल्यातील कलागुणांमुळे जितका चर्चेत आला तितकाच तो त्याचा शीघ्रकोपी आणि स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत आला. देशात चाललेल्या घडामोडींवर सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकारणावर आणि राज्यकर्त्यांवर केलेली टिकाही बरीच चर्चेत आली. विविधांगी व्यक्तिमत्व असलेल्या आस्ताद काळेविषयी अशा काही गोष्टी आहेत ज्याबाबत कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

आस्तादला लहानपणापासूनच अभिनय आणि गाण्याची आवड होती. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्याने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्याने अनेक संगीत नाटकांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. जसे कि परेश मोकाशी दिग्दर्शित “संगीत लग्न कल्लोळ” , “काहे कबीर“, “प्रोपोजल” तर “मिस्टर अँड मिसेस लांडगे” या विनोदी नाटकात सुद्धा त्याने महत्वाची भूमिका केली तसेच मागच्या वर्षीच झी मराठीच्या “तिला काही सांगायचंय” या नाटकात आस्तादने तेजस्विनी प्रधान सोबत मुख्य भूमिका साकारली. यात तो गंभीर भूमिकेत दिसला होता.हेदेखील वाचा- Pandharinath Kamble Birthday: पंढरीनाथ कांबळे ऊर्फ Paddy चे पोट धरून हसायला लावतील 'हे' मजेशीर सीन्स, Watch Video

आस्ताद काळे विषयी काही खास गोष्टी

  • आस्ताद काळेचे शालेय शिक्षण पुण्यामधील सेठ दगडूराम कटारिया या शाळेत झाले तर त्याने फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे अभिनेता होण्यासाठी आस्ताद पुण्याहून मुंबईला गेला.
  • आस्तादने “पुढचे पाऊल“, “ऊन पाऊस“, “असंभव“, “अग्निहोत्र“, “वादळवाट“, “सरस्वती” तर सध्या सुरु असलेली “चंद्र आहे साक्षीला” अश्या अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.
  • त्याचबरोबर आस्तादने फर्जंद, फत्तेशिकस्त, “प्लॅटफॉर्म” या चित्रपटात आस्तादने मुख्यभूमीक केली तर “लग्न मुबारक“, “निर्दोष“, “निवडुंग“, “निरोप” , “दमलेल्या बाबाची कहाणी“, या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. लवकरच तो आपल्याला पावनखिंड या चित्रपटात दिसणार आहे.
  • अक्षय कुमार आणि परिणिती चोपड़ा हे आस्ताद काळे चे बॉलिवूडमधील आवडते कलाकार आहेत.
  • वसंतराव देशपांडे हे त्याचे आवडते शास्त्रीय संगीत गायक आहेत.

    तडफदार व्यक्तिमत्व, स्पष्टवक्तेपणा, संगीताची उत्तम जाण आणि दमदार अभिनय यांसारख्या गुणांमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणा-या आस्ताद काळेला लेटेस्टली मराठीकडून हार्दिक शुभेच्छा!